कुडाळातील “त्या” भाजी विक्रेत्यांच्या संपर्कात कोणी आल्यास लपवू नका…

355
2
Google search engine
Google search engine
Google search engine

महेश कांदळगावकर; मालवणातील भाजी विक्रेत्यांना आवाहन, अन्यथा कठोर भूमिका…

 

मालवण ता.२४:  कुडाळमधील “त्या” कोरोना पॉझिटिव्ह भाजी विक्रेत्याच्या संपर्कात मालवणातील कोणी भाजीविक्रेते आल्यास त्यांनी माहिती लपवू नये, स्वतः पुढे येऊन आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी केले आहे.दरम्यान ज्यांच्याकडे मेडिकल सर्टिफिकेट नसेल त्यांना भाजी विक्रीस परवानगी मिळणार नाही.पालिकेला कठोर भूमिका घ्यायला लावू नका, असा इशाराही श्री.कांदळगावकर यांनी दिला आहे.याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले.
त्यात म्हटल्याप्रमाणे, शहरातील स्थानिक भाजी विक्रेते व मत्स्य विक्रेते या सर्वांचीही आरोग्य तपासणी पालिकेच्या वतीने लवकरच केली जाणार आहे.त्यामुळे मालवण शहर वासियांसाठी खरा कसोटीचा काळ सुरू झाला आहे.आज पर्यंत आपले शहर सुरक्षित ठेवण्यास नागरिकांनी प्रशासनाला जसे सहकार्य केले,तसेच सहकार्य यापुढेही नागरीक देतील यात शंका नाही.मात्र नागरिकांना काही सूचना करायच्या असतील तर कराव्यात.लवकरच गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर शहरातील उपाययोजना बाबत बैठक घेऊन निर्णय घ्यायचे असल्याने नागरिकांच्या सूचनाही विचारात घेतल्या जातील.
मालवण व्यापारी संघाने सुद्धा सर्व व्यापारी वर्गाच्या आरोग्य तपासणीसाठी पुढाकार घ्यावा.मुंबई-मालवण अथवा अन्य जिल्ह्यातून मालवणात प्रवासी घेऊन येणाऱ्या खाजगी बस मालकांनीही अधिक काळजी घ्यावी.येणाऱ्या प्रवाश्यांची व प्रवासाची पूर्ण माहिती घेऊन त्याची प्रत मालवण ग्रामीण रुग्णालय व पंचायत समिती येथे द्यावी.शहरातील व्यक्तींची नोंद नगरपालिका तर ग्रामीण भागातील व्यक्तींची नोंद ग्रामपंचायत स्तरावर करणे गरजेचे आहे.

\