बांदा-निमजगा येथील ३०० मीटर परिसर कंटेन्मेंट झोन जाहीर…

303
2
Google search engine
Google search engine
Google search engine

“त्या” व्यक्तीच्या संपर्कातील ५३ व्यक्तींचे स्वॅब आरोग्य विभागाने घेतले तपासणीसाठी…

बांदा ता.२४: शहरातील निमजगावाडी येथे मिळालेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील ५३ व्यक्तींचे स्वॅब आज आरोग्य विभागाने तपासणीसाठी घेतले. या सर्वांना आज क्वारंटाइन करण्यात आले आहे.बांदा-निमजगा येथील ३०० मीटर परिसर कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आल्याने सील करण्यात आला आहे.
संपर्कातील ३९ व्यक्ती या अतिजोखिमग्रस्त असून १३ व्यक्ती या मध्यम जोखिमग्रस्त असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी दिली. निमजगा जिल्हा परिषद शाळा ते लक्ष्मी-विष्णू अपार्टमेंट रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. याठिकाणीचा ३०० मीटर परिसर कंटेन्मेंट झोन करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अनिल जाधव, सरपंच अक्रम खान, जिल्हा परिषद सदस्य श्वेता कोरगावकर, उपसभापती शीतल राऊळ, तंटामुक्ती अध्यक्ष गुरुनाथ सावंत, वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी परिसराची पाहणी करून आढावा घेतला.

\