सिंधुदुर्गात आजपर्यंत एकूण २४९ रुग्णांना डिस्चार्ज…

339
2
Google search engine
Google search engine

डॉ. धनंजय चाकूरकर; जिल्ह्यात ५२ सक्रिय रुग्ण…

सिंधुदुर्गनगरी,ता.२४: जिल्ह्यात आजपर्यंत २४९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सद्यस्थितीत ५२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात काल प्राप्त झालेल्या अहवलानुसार आणखी ११ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये कुडाळ तालुक्यातील ५, कणकवली तालुक्यातील ३, सावंतवाडी तालुक्यातील २ आणि दोडामार्ग तालुक्यातील १ व्यक्तीचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.