भाजप युवा मोर्चाची निवेदनाद्वारे नगराध्यक्षाकडे मागणी…
वेंगुर्ला. ता.२४:
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली वेंगुर्ला-कॅम्प येथील व्यायामशाळा सुरु करण्यासाठी आज वेंगुर्ला भाजप युवा मोर्चातर्फे नगराध्यक्ष दिलीप गिरप यांना निवेदन देण्यात आले.
वेंगुर्ला-कॅम्प येथील नगरपरिषद मालकीच्या जागेत भाडे तत्त्वावर सुरु असलेली व्यायामशाळा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या बंद आहे. तंदुरुस्त रहाण्यासाठी जीवनात व्यायाम आवश्यक आहे. त्यामुळे गेले काही महिने व्यायामशाळा बंद असल्याने व्यायामपटूंची गैरसोय झाली आहे. सोशल डिस्टसिगचे सर्व नियम पाळून व्यायामशाळा सुरु करावी असे त्या निवदेनात नमूद केले आहे. यावेळी युवा मोर्चा शहर अध्यक्ष प्रणव वायंगणकर, उपाध्यक्ष राहूल मोर्डेकर, साईप्रसाद भोई, चिटणीस निलय नाईक, युवा मोर्चाचे गौरव धावडे, श्रीकृष्ण हळदणकर, जयदेव फडतरे, संजिव राजाध्यक्ष, सोशल मिडियाचे अमेय धुरी व भाजप तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर उपस्थित होते.
दरम्यान गणेश चतुर्थीनंतर व्यायामशाळा सुरु करण्याचे आश्वासन यावेळी नगराध्यक्ष गिरप यांनी उपस्थितांना दिले.