काँग्रेसची मागणी ; कुडाळातील “तो” पॉझिटिव्ह भाजीविक्रेता नसून हमाल असल्याचा दावा…
मालवण ता.२४: कुडाळ येथे आढळलेला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हा भाजी विक्रेता नसून तो एक हमाल आहे.मात्र कोरोना पॉझिटिव्ह भाजी विक्रेत्याच्या संपर्कात आल्याच्या कारणावरून मालवणातील भाजी विक्रेत्यांना नगरपालिका प्रशासनाकडून नाहक त्रास देण्याचे काम सुरू आहे.याबाबत लक्ष घालून भाजी विक्रेत्यांना होणारा नाहक त्रास थांबवावा,अशी मागणी मालवण तालुका काँग्रेसने तहसीलदार अजय पाटणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटल्याप्रमाणे, काल जिल्ह्यात आढळलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये कुडाळ येथील भाजी विक्रेता कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली होती.तसेच कुडळातील “त्या” भाजी विक्रेत्याकडून मालवण शहरातील भाजी विक्रेत्यांना भाजी पुरवठा होत असल्याने नगरपालिका प्रशासनाने मालवणातील २१ भाजी विक्रेत्यांना आरोग्य तपासणीची सूचना केली होती.आज या भाजी विक्रेत्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.मात्र कुडाळ येथे जो कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण भाजी विक्रेता म्हणून सांगण्यात येत आहे,तो भाजी विक्रेता नसून त्या भाजीवाल्याकडे काम करणारा हमाल असल्याची माहिती समोर आल्यावर मालवण तालुका काँग्रेसच्या वतीने आक्रमक भूमिका घेण्यात आली. यावेळी मालवणातील भाजी विक्रेत्यांना झालेल्या त्रासाबाबत प्रशासनाला जाब विचारण्यात आला आहे.
यावेळी तालुकाध्यक्ष महेश उर्फ बाळू अंधारी, तालुका चिटणीस अरविंद मोंडकर, युवककाँग्रेस जिल्हाध्यक्ष महेश लुडबे, सलीम ताजर आदी तसेच भाजी विक्रेते उपस्थित होते.काॅग्रेसची मागणी;कुडाळातील “तो” पॉझिटिव भाजीविक्रेता नसून हमाल असल्याचा दावा