सुधीर नकाशे; काही कृषी सेवकांकडून ठराविक शेतकऱ्यांनाचं दिला जातोय लाभ…
सिंधुदुर्गनगरी ता.२४: सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृषी विभागाच्या अनेक योजना अद्यापही सर्वसामान्य शेतकऱ्यांना माहीत नाहीत .काही कृषिसेवक आपल्या मर्जीतील ठराविक शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ देतात त्यामुळे गरीब गरजू शेतकरी कृषि योजनांपासून वंचित राहत आहेत असा आरोप सदस्य सुधीर नकाशे यानी कृषी समिती सभेत केला तर प्रत्येक कृषी सहाय्यक कडून योजनांचा लाभ किती व कोणत्या शेतकऱ्यांना दिला याचा अहवाल मागवून घ्या .असे आदेश कृषी सभापती तथा उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी दिले
जि प कृषि समितीची सभा उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज येथील बॅ नाथ पै समिती सभागृहात संपन्न झाली यावेळी समिती सचिव तथा जिल्हा कृषी विकास अधिकारी सुधीर चव्हाण ,सदस्य अमरसेन सावंत ,रणजित देसाई, महेंद्र चव्हाण ,अनुप्रीति खोचरे , वर्षा पवार आदींसह खातेप्रमुख अधिकारी उपस्थित होते
जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत विविध योजना राबवल्या जात आहेत मात्र अनेक शेतकरी अद्यापही या योजनांपासून वंचित आहेत अशी स्थिती सध्या पाहायला मिळत आहे कारण काही कृषिसेवक आपल्या मर्जीतील काही ठराविक शेतकऱ्यांनाच योजनांचा लाभ देत आहेत प्रत्येक वर्षी त्याच त्याच शेतकऱ्यांना लाभ दिल्याचे दिसून येत आहे त्यामुळे गोरगरीब गरजू शेतकरी योजनांपासून वंचित राहत आहेत .काही ठराविक शेतकऱ्यांचे आणि आपल्या कृषी सहाय्यक यांचे साटेलोटे असल्याने त्यांच्या घरी जाऊन योजनांची माहिती व लाभ दिला जातो .योजनांबाबत ग्रामपंचायत सदस्यांना किंवा अन्य शेतकऱ्यांना माहिती दिली जात नाही असा आरोप सदस्य सुधीर नकाशे यानी समिती सभेत केला तर जिल्ह्यात सगळीकडेच अशी स्थिती पाहायला मिळत आहे असे सदस्य अमरसेन सावंत यांनी सांगितले तेव्हा प्रत्येक कृषी सहाय्यक कडून त्यांनी किती व कोणत्या शेतकऱ्याला योजनांचा लाभ दिला याचा अहवाल मागून घ्या असे आदेश उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी यांनी दिले
सिंधुदुर्ग जिल्ह्यात 39 ठिकाणी हवामान व पर्जन्यमापक केंद्रे उभारण्यात आली असली तरी या केंद्रांमध्ये वारंवार बिघाड व दोष असल्याने अनेक शेतकरी विमा योजनेच्या लाभापासून वंचित राहत आहेत या हवामान केंद्रांमध्ये योग्य तापमान दाखवले जाते का असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे चुकीचा अहवाल दिला जात असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे तरी जिल्ह्यातील सर्व हवामान केंद्रांचा सर्वे करून योग्य तापमानाची नोंद होते का याची खात्री करावी अशी मागणी सदस्य रणजित देसाई यांनी केली
तिलारी प्रकल्पात सात गावातील शेतकऱ्यांची पंचवीस टक्के जमीन संपादित करण्यात आली तर 75 टक्के जमीन अद्यापही शेतकऱ्यांच्या नावे आहेत तेथे मोठ्या प्रमाणात लागवड होते तरी त्या ठिकाणी कोणत्याही कृषी सहाय्यक जात नाही त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना योजनांचा लाभ व मार्गदर्शन घेता येत नाही त्यामुळे या भागात तात्काळ कृषी सहाय्यक नेमावा असे आदेश उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी दिले तसेच शेतकऱ्यांचा आता शेतीकडे कल वाढला आहे पावर टिलर साठी मोठ्या प्रमाणात मागणी होऊ लागली आहे त्यामुळे यावर्षी 50 टक्के अनुदानावर ही योजना प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना करण्यात आल्या . कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत ग्रास कटर ,पावर टिलर ,वीज पंप यासाठी मोठ्या प्रमाणात प्रस्ताव येऊ लागले आहेत तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ घेता यावा यादृष्टीने योजना राबवा अशी सूचना रणजित देसाई यांनी केली जिल्हा परिषदेमार्फत राबवण्यात येणारा बांधावरची शाळा हा उपक्रम यावर्षी कोरोना महामारी मुळे घेता आला नाही तरी उन्हाळी शेतीत हा उपक्रम राबवण्याचे नियोजन करा तसेच प्रत्येक शाळांना भाजी बियाण्यांचे किट उपलब्ध करून देण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला