कणकवली पालिकेचा कंत्राटी कर्मचारी पॉझिटिव्ह…

3055
2
Google search engine
Google search engine
Google search engine

आणखीन सहाजणांची वाढ ; तीघे सावंतवाडीतील तर दोघे कुडाळचे

सिंधुदुर्गनगरी.ता,२४: जिल्ह्यात आज आणखी सहा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील एक कणकवली नगरपालिकेचा कंत्राटी कर्मचारी असल्याचे समजते.तर अन्य पाच जणांतील तीघे सावंतवाडीतील तर दोघे कुडाळ मधील आहेत.
आज एकूण तपासण्यात आलेल्या ११६ नमुन्यांपैकी ६ पॉझिटिव्ह आणि १०८ निगेटीव्ह आले आहेत. तर २ पेंडिंग आहेत.याबाबतची माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

दरम्यान, याबाबत सावंतवाडी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक उत्तम पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले,संबंधित सावंतवाडीत मिळालेले तिघेही जण हे ग्रामीण भागातील आहेत.सद्यस्थितीत ते क्वारंटाईन आहेत. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही.

\