वैभववाडी तालुक्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांची गरूडझेप

456
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वैभववाडी ता.२५ नुकत्याच जाहीर झालेल्या दहावी निकालात वैभववाडी तालुक्यातील चार दिव्यांग विद्यार्थी कु. दिक्षीता धर्मेंद्र पवार, कु. चैतीली भिमसेन जाधव, कु. राज रविंद्र बिले, कु. अक्षय सखाराम विचारे या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षात वैभववाडी तालुक्यातील एकूण दिव्यांग प्रमाणपत्र धारक चार विद्यार्थी बारावीच्या परीक्षेस लेखनिकच्या माध्यमातून व प्रत्येक तासी २० मिनिटे अशा वाढीव वेळेच्या सोयी सुविधांव्दारे परीक्षेस बसविण्यात आले होते. त्यापैकी चारही दिव्यांग विद्यार्थ्यांनी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत घवघवीत यश संपादन करून तालुक्याचे नाव शैक्षणिक क्षेत्रात उंचावले आहे.
या दिव्यांग विद्यार्थ्यांना गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे, प्रफुल्लकुमार कातोरे, संतोष चामलवाड, दत्ताराम तापेकर, महेश प्रभावळकर, श्रीमती वैदेही पिळणकर, श्रीमती स्नेहल रावराणे, श्रीमती सरीता जाधव, तानाजी कांबळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

\