अतुल काळसेकर; हळद लागवडीबाबत जनजागृतीसाठी सेल्फी वीथ हळद स्पर्धा…
कणकवली ता.२५:भाजपाच्यावतीने हिंदू आत्मनिर्भर अभियानाअंतर्गत हळद बियाणे वाटपाला उस्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर आता मोफत खत वितरण करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.दरम्यान हळद लागवडी बाबत जनजागृती होण्यासाठी खास महिलांसाठी “सेल्फी विथ हळद” अशी आगळीवेगळी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.याबाबतची माहिती अभियानाचे संयोजक अतुल काळसेकर यांनी दिली.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत १५ टन हळद बियाणे महिला बचत गट आणि शेतकऱ्यांना मोफत वितरीत करण्यात आले होते.भाजपा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हा पाठपुरावा करण्यात आला होता.त्यासाठी भगीरथ संस्थेचे मार्गदर्शन मिळाले होते.