आचरा, ता. २५ : आचरा वरचीवाडी येथील दशरथ मनोहर मिराशी (वय- ४०) याचा मृतदेह त्याच्या राहत्या घरात नायलॉन दोरीने गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला.आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही.याबाबत त्याचे वडील मनोहर मिराशी यांनी आचरा पोलिस ठाण्यात खबर दिली आहे.
वयोवृद्ध आई वडीलांसोबत राहणारा दशरथ मोलमजुरी करून पोट भरत होता. गुरूवारी कामावरुन उशिरा घरी आलेला दशरथ घरात येरझारा घालत असल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले.रात्रीचे जेवणही त्याने केले नसल्याचे सांगितले जात आहे.पहाटे जाग आल्यावर वडिलांना दशरथ गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला.याबाबत आचरा पोलिस ठाण्यात खबर देण्यात आली असून आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.सहाय्यक पोलिस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल श्री. चव्हाण, श्री. देसाई अधिक तपास करत आहेत. दशरथच्या पश्चात आई, वडील, बहिण, भावजय पुतण्या, भावोजी असा परिवार आहे.
आचरा येथे युवकाची गळफास लावून आत्महत्या…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES