डॉ. धनंजय चाकूरकर; जिल्ह्यात सक्रीय ५७ रुग्ण ….
सिंधुदुर्गनगरी,ता.२५: जिल्ह्यात आजपर्यंत २५० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सद्यस्थितीत ५७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात काल प्राप्त झालेल्या अहवलानुसार आणखी ७ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये कुडाळ तालुक्यातील २, कणकवली तालुक्यातील १, सावंतवाडी तालुक्यातील ३ आणि रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील १ व्यक्तीचा समावेश आहे.
राजापूर तालुक्यातील सदर रुग्णांची तपासणी खाजगी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये करण्यात आली आहे. त्यामध्ये त्याचा अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाल्याविषयीची माहिती रत्नागिरी जिल्हा प्रशासनास देण्यात आले असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी सांगितले आहे.