माजगाव येथील घटना; ग्रामस्थ आक्रमक, ग्रामपंचायतीकडून दंडात्मक कारवाई…
सावंतवाडी ता.२५: माजगाव-पंचमनगर परिसरात रस्त्याच्या शेजारी कचरा टाकणे आज शहरातील एका प्रतिष्ठित नागरिकाला चांगलेच भोवले.हा प्रकार काही ग्रामस्थांनी पाहिल्यामुळे त्यांनी आक्रमक भूमिका घेत कारवाईची मागणी केली.अखेर ग्रामपंचायतीकडून त्यांच्यावर पाच हजाराची दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही घटना आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास येथील भाईसाहेब सावंत समाधी परिसरात घडली.
याठिकाणी काही लोक वारंवार कचरा टाकत होती.यासंदर्भात ग्रामपंचायतीने योग्य त्या उपाययोजना करुन संबधित ठिकाणी कचरा टाकू नये,अशा पद्धतीचा सुचना फलकही लावण्यात आला होता.मात्र असे असताना सुद्धा संबंधित व्यक्तीने कचरा टाकल्याने तेथील ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा हाती घेतला.यावेळी येथील ग्रामपंचायत प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली.तसेच यापुढेही कचरा टाकणाऱ्यांवर ग्रामपंचायत प्रशासन आणि ग्रामस्थांची करडी नजर राहणार आहे.असे सांगण्यात आले.