बनावट ई-पास तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश…

880
2
Google search engine
Google search engine
Google search engine

चौघे अटकेत; मुंबईसह सिंधुदुर्ग पोलिसांची कारवाई…

मालवण ता.२५: कोरोनाच्या काळात मुंबईतून येण्या-जाण्यासाठी बनावट पास देणारे रॅकेट आज मुबई क्राईम ब्रांचच्या पोलिसांनी सिंधुदुर्ग पोलिसांच्या मदतीने उघड केले.यात मुंबईतील चौघा टॅक्सी चालकांचा समावेश आहे.या चौघांनाही आज हडी येथे अटक करण्यात आली.दरम्यान यातील तिघांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले असून एकाला येथील न्यायालयात हजर केले असता सोमवार पर्यत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
मुंबई पोलिसांच्या ताब्यात असलेल्यांमध्ये अब्दुल करीम मोहम्मद शेख ( २८), समीर सम्मशुद्दीन शेख (३६), नुर माहम्मद शेख (३०) या तीघांचा समावेश आहे.तर मालवण पोलीसांच्या ताब्यात असलेल्या संशयीत आरोपींमध्ये सर्फराज हसन शेख (३७) याचा समावेश आहे. हे चारही युवक मुंबईत टॅक्सी डायव्हर म्हणून कार्यरत होते.मालवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण यांनी याप्रकरणी तक्रार दिल्याने संबंधित चौघा संशयीतांच्या विरोधात भादवि कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१, ३४, आय. टी. अॅक्ट ६६ (सी) ६६ (डी) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.यात बनावट कागदपत्रे बनवून फसवणूक करण्यात आल्याचे म्हटले आहे.यातील तीघांना मुंबई पोलीसांनी ताब्यात घेतल्याने उर्वरीत सर्फराज याला मालवण पोलीसांनी अटक केली आहे.त्याला मालवण न्यायालयासमोर हजर केले असता सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.

\