सर्वांचे स्वॅब आरोग्य विभागाने घेतले तपासणीसाठी;३०० मीटर परिसर सील…
बांदा ता.२५: शहरात मिळालेल्या कोरोना रुग्णाच्या संपर्कातील ३४ व्यक्तींचे स्वॅब आज आरोग्य विभागाच्या वतीने घेण्यात आले. शुक्रवारी रात्री उशिरा पोलीस प्रशासनाने कंटेन्मेंट झोनची कार्यवाही करत ३०० मीटर परिसर सील केला.
आज घेण्यात आलेले स्वॅब हे अतिजोखिमग्रस्त असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी सांगितले. अजूनही संपर्कातील व्यक्तींची शोध मोहीम सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले. संपर्कातील सर्वांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. कोरोना बाधित रुग्णावर उपचार करणाऱ्या खासगी व वैद्यकीय अधिकारी यांचे देखील स्वॅब घेण्यात आले आहेत.