सावंतवाडी,ता.२६: जिल्हा रुग्णालयाकडुन काल रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार आढळून आलेले सहाही रुग्ण चितारआळी परिसरातील आहेत. त्यात काही जण त्या दाम्पत्यांचे नातेवाईक, तर काही जण शेजारी आहेत. याबाबत तालुका आरोग्य अधिकारी सौ.वर्षा शिरोडकर यांनी दुजोरा दिला आहे.
दरम्यान पालिकेकडुन या पार्श्वभूमीवर विशेष दक्षता घेण्यात आली आहे. तसेच कोणीही अफवांना बळी पडू नये, असे आवाहन आरोग्य विभाग तसेच पालिका प्रशासनाकडुन करण्यात आले आहे. सावंतवाडी चितारआळी परिसरातील संबधित दाम्पत्य मुंबईत गेले होते. तेथून आल्यानंतर ते पॉझिटिव्ह आढळले होते. दरम्यान त्या दाम्पत्यांची दोन मुले आणि आईवडीलांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. मात्र काल रात्री प्राप्त झालेल्या अहवालात तब्बल सहा जण पॉझिटिव्ह असल्याचे आरोग्य प्रशासनाचे म्हणणे आहे.