संस्था अध्यक्षांचे स्पष्टीकरण; नियमित व्यवहार नियम पाळून सुरू असल्याचे म्हणणे…
सावंतवाडी,ता.२६: येथील कॅथॉलिक अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी सावंतवाडी या संस्थेमधील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह मिळाल्याची “ती” अफवा आहे. त्यामुळे अशा अफवांना कुणी बळी पडू नये,असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष पी.एफ.डान्टस यांनी केले आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्र दिले आहे.
त्यात असे नमूद करण्यात आले आहे की, सावंतवाडी चितारआळी परिसरात कोरोना रुग्ण सापडले आहेत. दरम्यान यात कॅथॉलिक बँकेचा कर्मचारी असल्याची अफवा काही व्यक्तींकडून सावंतवाडी शहरामध्ये पसरवली जात आहे. मात्र संस्थेच्या कोणत्याही कर्मचार्याला कोरोनाची बाधा झालेली नाही.आजाराच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती दक्षता घेवून तसेच सोशल डीस्टंसिगचे नियम पाळून सर्व काम सुरू आहे. त्यामुळे अशा अफवांना कोणी बळी पडू नये,असे आवाहन करण्यात आले आहे.