बांदा,ता.२६: कोरोना पार्श्वभूमीवर येथील बांदेश्वर मंदिरात श्रावणी सोमवार निमित्त दर्शनाला येणाऱ्या भाविकांची काळजी घेण्यासाठी येथील डॉ.भालचंद्र कोकाटे,सिद्देश पावसकर,हेमंत दाभोलकर,राम लाड,निलेश पटेकर यांनी पुढाकार घेऊन देवस्थान कमिटीला “थर्मल गन” भेट दिली.यावेळी देवस्थान कमिटीचे अध्यक्ष सुभाष मोर्ये यांच्याकडे ही थर्मल गन सुपूर्त करण्यात आली.
दरवर्षी येथील बांदेश्वर मंदिरात श्रावणी सोमवार निमित्त भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते.मात्र यावर्षी असलेले कोरोनाचे संकट लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला.यावेळी देवस्थान कमिटीचे बाळू सावंत,राजा सावंत,उमेश मोर्ये आदी उपस्थित होते.