सावंतवाडी ता.२६: डी.फार्मसी परीक्षेतील उत्कृष्ट निकालाची परंपरा राखत यावर्षीही यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी आणि कॉलेज ऑफ डी.फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी सुयश मिळवले आहे.राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या प्रथम वर्ष डी.फार्मसी परिक्षेचा निकाल जाहीर झाला असून दोन्ही कॉलेजचा एकूण निकाल ९६ टक्के लागला आहे.
कॉलेजच्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांची नावे पुढील प्रमाणे- यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ डी. फार्मसी (प्रथम वर्ष)- प्रियांका शेडगे, गौरी आडारकर(८८.७३%) प्रथम, ओमकार पाटणे (८८.५५%) द्वितीय, रूतिका चव्हाण (८४.९१%) तृतीय क्रमांक. यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी (डी.फार्मसी – प्रथम वर्ष) – विनया गावडे (८७.२७%) प्रथम, इझान बवानी (८६.१८ %) द्वितीय, धीरज चव्हाण, मोहम्मद गोलंदाज, मनस्वी गोसावी, प्राची कांबळे (८२.४६%) तृतीय क्रमांक. कॉलेजमधून डी.फार्मसीच्या दोन तुकडया यावर्षी बाहेर पडत असून साठ टक्के विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणासाठी तर चाळीस टक्के विद्यार्थ्यांनी स्वतःच्या व्यवसायासाठी पसंती दर्शवली आहे. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोंसले, बी. फार्मसी प्राचार्य डॉ. विजय जगताप, डी. फार्मसी प्राचार्य सत्यजित साठे व विभागप्रमुख प्रा.ओमकार पेंडसे यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.