Tuesday, March 18, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यारक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर "इको फ्रेंडली राखी स्पर्धा"...

रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर “इको फ्रेंडली राखी स्पर्धा”…

वेंगुर्ले इनरव्हील क्लबचे आयोजन

वेंगुर्ला.ता,२६: 
इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्ला यांच्यावतीने रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर निसर्गाशी सुसंवाद साधण्याच्या व पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने ‘‘इको फ्रेंडली राखी‘‘ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
विजेत्यांना रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देण्यात येणार असून स्पर्धेचे परीक्षण जे.जे.स्कुल ऑफ आर्टचे माजी प्राध्यापक सुनील नांदोस्कर करणार आहेत. या स्पर्धेसाठी नैसर्गिक पाने फुले वापरता येतील. निसर्गातील इतर पर्यावरणपूरक वस्तू वापरता येतील. तसेच धान्य, डाळी, फळे, फुले, पालेभाज्या, बिया, मातीचे प्रकार व तत्सम वस्तूही वापरता येतील. यावेळी नाविन्यपूर्ण वस्तू वापराव्यात जेणेकरुन स्पर्धकांना प्राधान्य मिळेल. तसेच प्लास्टिक, थर्माकोल किवा ज्या वस्तू विघटन होत नाहीत अशा वस्तू वापरु नयेत, अशी महिती देण्यात आली.
२ ऑगस्ट पर्यंत स्पर्धकांनी येथील एल.पी.स्पोर्ट्स ऑफिस, आम्रतरु कॉम्प्लेक्स, वेंगुर्ला येथे सकाळी १० ते दुपारी २ व दुपारी ३ ते संध्याकाळी ६ या वेळेत जमा करावीत. अधिक माहितीसाठी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा गौरी मराठे (९०४९३१६८००) व पूनम जाधव (८८८८५०७३३४) यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments