Friday, December 5, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याकोरोनाग्रस्तांच्या घरापुरतीच कंटेन्मेट झोन ठेवा, सर्वांना वेठीस नको...

कोरोनाग्रस्तांच्या घरापुरतीच कंटेन्मेट झोन ठेवा, सर्वांना वेठीस नको…

सुरेश भोगटेंची मागणी; गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठ बंद राहिल्यास तोटा…

सावंतवाडी,ता.२७: शहरात कोरोनाचा रुग्ण आढळून आलेला आहे.त्यामुळे ऐन चतुर्थीच्या तोंडावर लाकडी खेळण्यासाठी प्रसिद्ध असलेला चितारआळी बाजार व परिसरातील दुकाने बंद अवस्थेत आहेत.परिणामी लाकडी खेळणी व्यवसायिक आणि परिसरातील अन्य दुकानदार यांचे नुकसान होऊ नये, यासाठी प्रशासनाने कोरोनाग्रस्तांच्या घरापुरती कंटेनमेंट झोन ठेवावा, सर्व लोकांना वेठीस धरू नये, तसेच संबंधित लोकांना आवश्यक असलेली साधनसामुग्री पोहोचवण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी सावंतवाडीतील माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी प्रशासनाकडे केली आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे. यात त्यांनी असे नमूद केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments