व्ही.एन.नाबर इंग्लिश मिडीयम स्कुलला “थर्मल गन” प्रदान…

112
2
Google search engine
Google search engine
Google search engine

बांदा,ता.२७: कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शिक्षक व विद्यार्थ्यांचे तापमान तपासणे महत्वाचे आहे. तसेच शाळेत येणाऱ्या प्रत्येकाचे सुरक्षिततेसाठी थर्मल गनद्वारे तापमान तपासल्यास आरोग्याच्या दृष्टीने हिताचे ठरेल, असे प्रतिपादन लुपिन फाऊंडेशनचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी आनंद वसकर यांनी येथे केले.
येथील व्ही. एन. नाबर इंग्लिश मिडीयम शाळेला लुपिन फाऊंडेशन सिंधुदुर्गच्यावतीने थर्मल गन प्रदान करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना आरोग्यविषय मार्गदर्शन करताना श्री.वसकर बोलत होते. यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका मनाली देसाई तसेच अन्य शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
मुख्याध्यापिका सौ. देसाई म्हणाल्या की, लुपिन फाऊंडेशन सिंधुदुर्ग यांनी शाळेस थर्मल गन प्रदान केल्याने आरोग्याची काळजी घेता येईल.

\