बांदा भाजपाकडुन सरपंच अक्रम खान यांना निवेदनाद्वारे आश्वासन
बांदा.ता,२७: गणेश चतुर्थीच्या काळात बांदा शहरात येणाऱ्या चाकरमान्यांना आवश्यक असलेली सुविधा देण्यासाठी बांदा भाजपाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीच्या खांद्याला-खांदा लावून आम्ही काम करू,असे आश्वासन बांदा भाजपचे शहराध्यक्ष राजा सावंत यांनी सरपंच अक्रम खान यांना दिले आहे.याबाबत त्यांनी आज निवेदन दिले.त्यात त्यांनी असे म्हटले आहे.
यावेळी शहर युवा अध्यक्ष साई सावंत, शक्ती केंद्र प्रमुख मनोज कल्याणकर, तालुका उपाध्यक्ष बाळू सावंत, सिद्धेश पावसकर, ग्रामपंचायत सदस्य शाम मांजरेकर, तालुका कार्यकारिणी सदस्य संतोष सावंत, युवा कार्यकर्ते बाबा काणेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.