प्रदेशकडून सुचना; सात दिवसात म्हणणे सादर न केल्यास,शिस्तभंगाची कारवाई…
सावंतवाडी,ता.२७: नव्याने जाहीर करण्यात आलेली काँग्रेसच्या कार्यकारीणीला न जुमानता आपणच काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आहोत,असा दावा करणाऱ्या मालवण येथील माजी तालुकाध्यक्ष महेश ऊर्फ बाळू अंधारी व कणकवलीचे माजी तालुकाध्यक्ष महेंद्र सावंत यांना काँग्रेसकडुन कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
आपणाला वारंवार सूचना देऊन सुद्धा पक्षाला हानी पोहोचेल, असे काम करत आहात, त्यामुळे जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांच्याकडे सात दिवसात याचा खुलासा करण्यात यावा, अन्यथा आपल्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा सरचिटणीस प्रकाश जैतापकर यांनी दिलेल्या नोटिशीत त्यांनी म्हटले आहे. याबाबत जिल्हा काँग्रेसकडुन प्रसिद्धी पत्रक देऊन माहिती दिली आहे.