Sunday, March 16, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याराणेसमर्थक विकास कुडाळकर अखेर शिवबंधनात....

राणेसमर्थक विकास कुडाळकर अखेर शिवबंधनात….

खासदार राऊतांच्या उपस्थित प्रवेश ; भाजपला मोठा धक्का

सिंधुदुर्गनगरी.ता,२७: कट्टर राणे समर्थक तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विकास कुडाळकर यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत त्यांना जाहिर प्रवेश देण्यात आला.
यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते,जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत,गटनेते नागेंद्र परब, माजी तालुकाप्रमुख संतोष शिरसाट, कुडाळ तालुका प्रमुख राजन नाईक,रुची राऊत ,गितेश राऊत, अशा मोजक्या पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत ओरोस येथील खासदार कार्यालयात सोमवारी हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.खा.विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री उदय सामंत, आ.वैभव नाईक यांच्या सोबत जिल्हाप्रमुख संजय पडते, गटनेते नागेंद्र परब यांच्या साथीने कुडाळ तालुक्यासह अन्य ठिकाणी यापुढे शिवसेना संघटना वाढविण्यासाठी प्रामाणिक काम करणार असल्याचे यावेळी कुडाळकर यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments