जिल्हा प्रशासनाची माहिती; कोरोना रूग्णांची आतापर्यंतची संख्या ३४२…
सिंधुदुर्गनगरी,ता.२७: जिल्ह्यात आज पुन्हा आठ कोरोनाचे रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत. यात कणकवली शहरातील चौघे,जानवली मधील तिघांचा समावेश आहे, तर सावंतवाडी मधील एकाचा समावेश आहे.आता जिल्ह्यातील कोरोनाची संख्या ३४२ ची झालेली आहे यातील ७७ रूग्ण सक्रिय आहेत. याबाबतची माहिती जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून देण्यात आली.
सकाळी सावंतवाडीत ४ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. कणकवलीत सापडलेल्या रूग्णांमध्ये यापूर्वी आढळलेल्या कोरोना बाधितांच्या नातेवाईकांचा समावेश आहे. कणकवलीतील नव्या कोरोना बाधितांमध्ये बांधकरवाडी २, बाजारपेठ २ आणि जानवलीतील तिघांचा समावेश आहे.