Sunday, March 16, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याभोसले पॉलीटेक्निकतर्फे ३० जुलैला लाईव्ह वेबिनारचे आयोजन...

भोसले पॉलीटेक्निकतर्फे ३० जुलैला लाईव्ह वेबिनारचे आयोजन…

सावंतवाडी ता.२८: राज्य तंत्रशिक्षण मंडळ व यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक यांच्यावतीने १०-१२ वी विद्यार्थ्यांकरिता ३० जुलै रोजी स.११:०० ते १:०० यावेळेत ऑनलाइन करिअर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
युट्युबद्वारे या वेबिनारचे थेट प्रसारण होणार असून यामध्ये राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे १०-१२ वी नंतर उपलब्ध असणारे कोर्सेस,त्यांची प्रवेश प्रक्रिया,करिअरच्या उपलब्ध संधी तसेच विद्यार्थ्यांना मिळू शकणाऱ्या शिष्यवृत्ती याविषयीचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.प्राचार्य गजानन भोसले,मेकॅनिकल विभाग प्रमुख प्रा.नाथा साळवे, ट्रेनिंग व प्लेसमेंट विभाग प्रमुख,प्रा.मिलिंद देसाई, जनसंपर्क अधिकारी नितीन सांडये हे यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील.या वेबिनारमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी https://youtu.be/uOlGzd4zgtA या युट्युब लिंकचा वापर करावा,असे आवाहन कॉलेजतर्फे करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments