चंद्रकांत पाटील; निवडणुका मात्र स्वबळावरच लढणार…
मुंबई ता.२८: कार्यकारिणी बैठकीत भाजपाने स्वबळाचा नारा दिला असला तरीही राज्याच्या हितासाठी आजही शिवसेनेसोबत जायची तयारी आहे,असे वक्तव्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. दरम्यान जरी एकत्र आलो तरी निवडणुका मात्र स्वबळावर लढणार असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.याबाबतची माहिती त्यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.
यावेळी ते पुढे म्हणाले, महाराष्ट्राच्या हितासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व केंद्राने निर्णय घेतल्यास शिवसेना-भाजपा पुन्हा एकत्र येऊ शकते,मात्र आपण जरी एकत्र आलो तरी निवडणुका मात्र एकत्र लढणार नाही.त्या स्वबळावरच लढविल्या जातील,असे म्हटले आहे.



