Sunday, March 16, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याजिल्हा सीसीटीव्ही कक्षेत आणण्याचा राज्यातील पहिला मान सिंधुदुर्गाला...

जिल्हा सीसीटीव्ही कक्षेत आणण्याचा राज्यातील पहिला मान सिंधुदुर्गाला…

अनिल देशमुख; पालकमंत्री उदय सामंतांच्या उपस्थितीत ऑनलाईन लोकार्पण…

सिंधुदुर्गनगरी ता.२८:  संपूर्ण जिल्हा सीसीटीव्हीच्या कक्षेत आणण्याचा राज्यातील पहिला मान सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळाला आहे.त्याबद्दल जिल्हा वासियांचे कौतुक,असे प्रतिपादन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले.जिल्ह्यातील सीसीटीव्ही सनियंत्रण योजनेचे आज श्री.देशमुख यांच्या हस्ते व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत ऑनलाईन लोकार्पण झाले.यावेळी ते बोलत होते.
या सोहळ्यास खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी, पोलीस अधिक्षक दीक्षितकुमार गेडाम हे जिल्हा पोलीस मुख्यालयामध्ये उपस्थित होते. तर आमदार दीपक केसरकर, आमदार नितेश राणे यांच्या सह सर्व नगराध्यक्ष, पोलीस ठाण्याचे प्रमुख हे ऑनलाईन उपस्थित होते.
जिल्ह्याचे आजी व माजी दोन्ही पालकमंत्री  यांनी चांगले काम केले असल्याचे सांगून गृहमंत्री पुढे म्हणाले की, गुन्हेगारी कमी करण्यासाठी, कायदा व सुव्यवस्ता राखण्याच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे हे उपयुक्त आहे . सध्याच्या कोरोनाच्या काळा जिल्ह्याील पोलीस दल, महसूल यंत्रणा आरोग्य यंत्रणा अहोरात्र काम करत आहे. त्यांच्या कामाचे मला कौतुक असल्याचेही ते म्हणाले.
पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, डीपीडीसीमधून मिळालेल्या निधीचा सदुपयोग जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी चांगल्या प्रकारे केले आहे. ही यंत्रणा जिल्ह्यासाठी नक्कीच वरदान ठरणार आहे. गुन्हेगारी कमी करण्यासोबतच यामुळे जिल्ह्याच्या विकासालाही चालना मिळणार आहे.
यावेळी खासदार विनायक राऊत यांनी पोलीस दलाचे अभिनंदन केले. आमदार दीपक केसरकर यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्ममातून निधी उपलब्ध करुन देण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याचेही सांगितले. आमदार नितेश राणे यांनीही यावेळी पोलीस दलाचे अभिनंदन केले व अशा चांगल्या कामांमध्ये सर्वांनी एकत्र काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली.        जिल्हाधिकारी म्हणाले की या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील महिला अधिक सुरक्षित होतील.
जिल्हा पोलीस अधिक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी सर्वांचे स्वागत केले व शेवटी आभार मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पोलीस उपनिरीक्षक श्रीमती कुलकर्णी यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments