मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम;६० रक्तदात्यांचा सहभाग…
वैभववाडी ता.२८: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी तालुका शिवसेनेच्यावतीने आयोजित रक्तदान शिबीरात ६० रक्तदात्यांनी रक्तदान केले.
वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात आयोजित या रक्तदान शिबीराचे उद्दघाटन शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी केले.यावेळी जिल्हा बॕंक अध्यक्ष सतीश सावंत,शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके, जिल्हा बॕंक संचालक दिगंबर पाटील, माजी सभापती लक्ष्मण रावराणे, शहरप्रमुख प्रदीप रावराणे, संभाजी रावराणे, अशोक रावराणे, स्वप्नील धुरी, रमेश तावडे, राजेश तावडे, बाबा मोरे,जितेंद्र तळेकर, अतुल सरवटे, दीपक पवार, दीपक कदम, संजय निकम तसेच जिल्हा रक्तपेढीचे डाॕक्टर व कर्मचारी उपस्थित होते.
कोरोनाच्या संकटकाळात जिल्ह्यातील रक्तपेढीमध्ये तुतवडा भासू नये यासाठी सामाजिक बांधीलकी जोपासत वैभववाडी शिवसेना पदाधिका-यांनी आयोजित केलेले रक्तदान शिबीराचे सर्वांनकडून कौतुक केले जात आहे.