सावंतवाडी राष्ट्रवादीचा सवाल; मुख्याधिकार्यांना निवेदन…
सावंतवाडी,ता.२९: येथील पालिका प्रशासनाकडुन एकीकडे अतिक्रमण हटविण्यात येत आहे.तर दुसरीकडे अनधिकृत टपर्या उभारल्या जात आहे.हे दोन्ही प्रकार थांबविण्यात यावेत,अशी मागणी आज पालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्याकडे राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांकडुन करण्यात आली.यावेळी जिल्हा ग्राहक सेलचे अध्यक्ष पुंडलीक दळवी,शहर अध्यक्ष सत्यजित धारणकर,गुरूदत्त कामत,रंजन निर्मल,चित्रा बाबर देसाई आदी उपस्थित होते.
यावेळी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की,सावंतवाडी शहर ऐतिहासीक आहे.मागील पंधरा वर्षापुर्वी शहरात स्टॉल,टपर्या हटवून त्यांना नव्या कॉम्प्लेक्स मध्ये जागा उपलब्ध करुन देण्यात आली होती. मात्र,आता नव्याने शहरात खोके, टपर्या,हातगाडी वाढत आहेत.काही ठिकाणी रस्ते अरुंद आहेत. त्यामुळे नागरीकांना त्रास होत आहे.त्यामुळे याचा विचार व्हावा,पालिकेच्या परवागनी शिवाय कोणालाही परवानगी देण्यात येवू नये,तसेच नव्याने कॉप्लेक्स उभारुन बेकारांना रोजगार द्यावा,अशी मागणी करण्यात आली आहे.