Tuesday, March 18, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याटोपीवाला हायस्कूलची मिहिका केनवडेकर तालुक्यात प्रथम...

टोपीवाला हायस्कूलची मिहिका केनवडेकर तालुक्यात प्रथम…

मालवण तालुक्याचा दहावीचा निकाल ९९.०४ टक्के…

मालवण ता.२९: तालुक्याचा दहावी परीक्षेचा निकाल ९९.०४ टक्के लागला असून तालुक्यात परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या १३५८ विद्यार्थ्यांपैकी १३४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.यामध्ये ६८२ मुलांपैकी ६७४ मुले,तर ६७६ मुलींपैकी ६७१ मुली उत्तीर्ण झाल्या.तालुक्यात एकूण ३२ शाळांपैकी तब्बल २७ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.तालुक्यातून टोपीवाला हायस्कुलच्या मिहिका विजय केनवडेकर हिने ४९७ गुण मिळवीत प्रथम क्रमांक मिळवला. जयगणेश इंग्लिश मिडीयमची श्रावणी परुळेकर ४९४ गुण मिळवून द्वितीय तर दीक्षा तोंडवळकर ४९३ गुण मिळवून तृतीय आली आहे. रेकोबा विद्यालय वायरीच्या श्रावणी कुबल व आचरा न्यू इंग्लिश स्कुलची प्रिया धुळे या दोघांनी प्रत्येकी ४८७ गुण मिळवीत तालुक्यात चतुर्थ क्रमांक मिळवला. तर रोझरी इंग्लिश स्कुलच्या संस्कृती सतीश धामापुरकर हिने ४८६ गुण मिळवीत तालुक्यात पाचवा क्रमांक मिळवला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments