पालिकेची नरमाईची भूमिका; उद्यापासून भाजीविक्री पूर्ववत सुरू होणार…
मालवण ता.२९: येथील भाजी विक्रेत्यांनी नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात घेतलेल्या बेमुदत बंदचे आंदोलन अखेर आज मागे घेण्यात आले आहे.त्यामुळे उद्यापासून भाजीविक्री पूर्ववत सुरू होणार आहे.याबाबतची माहिती काँग्रेसचे पदाधिकारी बाळू अंधारी यांनी दिली.
येथील पालिकेच्या प्रशासनाने स्वॅब टेस्टिंगची सक्ती केल्यामुळे भाजी विक्रेत्यांनी बेमुदत बंद पुकारला होता.परंतू आता मात्र पालिका प्रशासनाने नरमाईची भूमिका घेतली आहे.भाजी विक्रेत्यांसाठी काढण्यात आलेले स्वॅब टेस्टिंगचे आदेश रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे भाजी विक्रेत्यांनी आपला बंद मागे घेत असल्याचे सांगितले आहे.



