Sunday, March 16, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यासावंतवाडी तालुक्‍याचा दहावीचा निकाल ९९.०८ टक्के...

सावंतवाडी तालुक्‍याचा दहावीचा निकाल ९९.०८ टक्के…

पुन्हा मुलींचीच बाजी;आरपीडीची राजवी डामरेकर प्रथम

सावंतवाडी ता.२९: तालुक्यात दहावी परीक्षेचा निकाल ९९.०८ टक्के लागला आहे.तालुक्यातून परीक्षेला बसलेल्या २१९५ विद्यार्थ्यांपैकी २१७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.बारावीप्रमाणे दहावीतही मुलींनीच बाजी मारली असून राणी पार्वतीदेवी हायस्कूलची विद्यार्थिनी राजवी रमेश डामरेकर ९९.८० गुणांसह तालुक्यात प्रथम,कळसुलकर हायस्कूलची स्वराली दादासाहेब शिंदे व मानसी रघुनंदन माळकर ९९.६० गुणांसह द्वितीय ,तर आर.पी.डी ची प्राजक्ता डुगल व कळसुलकरची श्रावणी यादव ९९.४० गुण मिळवीत तालुक्यात संयुक्तरित्या तृतीय आली आहेत.
तालुक्यातील ४५ माध्यमिक विद्यालयापैकी ३५ विद्यालयाचा शंभर टक्के लागला आहे.दरम्यान तालुक्याचा निकाल खालीलप्रमाणे….

आर.पी.डी. हायस्कूल 100 टक्के

राजवी रमेश डामरेकर हिने ९९.८० टक्के गुण मिळवित प्रशालेत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. प्राजक्ता मुकुंद डुगल ९९.४० टक्के गुणासह द्वितीय तर सुहानी प्रकाश गावडे हिने ९८ टक्के गुण मिळवीत तृतीय क्रमांक मिळवला आहे. प्रशालेतून परिक्षेस प्रविष्ठ झालेले सर्व १३७ विद्यार्थी विद्यार्थी उर्तीर्ण झाले आहेत. .

मिलाग्रीस हायस्कूलची 100

सावंतवाडी मिलाग्रीस हायस्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला असून प्रशालेमधून अदिती लक्ष्मण शेडगे हिने ९८.४० टक्के प्राप्त करून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. हर्षदा सुहास चिंदरकर हिने ९७.६० टक्के प्राप्त करून द्वितीय तर विराज मिलन वालावलकर याने ९७.४० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला आहे. प्रशालेतून परिक्षेस प्रविष्ठ झालेले सर्व २२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
कळसुलकर हायस्कूलचा ९३.१० टक्के निकाल
सावंतवाडीतील कळसुलकर हायस्कूलचा निकाल ९३.१० लागला आहे. परीक्षेस प्रविष्ट झालेल्या ८७ विद्यार्थ्यांपैकी ८१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. स्वराली दादासाहेब शिंदे व मानसी रघुनंदन माळकर यांनी ९९.६० टक्के गुण मिळवीत संयुक्तरित्या प्रशालेत प्रथम तर तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळविला आहे. श्रावणी अनिल यादव हिने ९९.४०टक्के गुण मिळवीत प्रशालेत द्वितीय तर दिशा राजेश गुडेकर ९८.४० टक्के गुण मिळवित तृतीय आली आहे.

मदरक्वीन्स हायस्कुल 100 टक्के

सावंतवाडी मदरक्वीन्स प्रशालेचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. निखील भोसले हा विद्यार्थी ९५.६० टक्के गुण मिळवीत प्रशालेत प्रथम आला असून मुस्कान जुनेजा हिने ९४.६० टक्के गुण मिळवीत द्वितीय तर योगा देसाई ९४.४० टक्के गुण मिळवीत तृतीय आली आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.

सेंट्रल इंग्लिश स्कूल १०० टक्के
सावंतवाडीतील सेंट्रल इंग्लिश स्कूल चा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. प्रशालेमधून कु. नुषबा अब्दुल खालिद ख्वाजा हिने ९३.४० टक्के प्राप्त करून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तनुश्री नितीन माने हिने ९२.०० टक्के प्राप्त करून द्वितीय तर असजद समीर बेग याने ९१.२० टक्के प्राप्त करून तृतीय क्रमांक मिळवला आहे.
सेंट्रल उर्दू हायस्कूल १०० टक्के
सावंतवाडीतील सेंट्रल उर्दू स्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. प्रशालेमधून आयेशा समीर बागवान ९०.२० टक्के प्राप्त करून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. यासिर मलिक आसिफ बागवान ८८ टक्के प्राप्त करून द्वितीय तर आयान समीर पटेल ८५.२० टक्के प्राप्त करून तृतीय क्रमांक मिळवला आहे.

शांतिनिकेतन इंग्लिश मिडीयम हायस्कूलचा ९७.५० टक्के
सावंतवाडी शहरातील शांतिनिकेतन इंग्लीश मिडीयम स्कूलचा दहावीचा निकाल ९७.५० टक्के लागला असून प्रशालेमधून गायत्री सुजित कोरगांवकर हिने ९६.८० टक्के प्राप्त करून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तर सायली संजय गावडे हिने ९४.८० टक्के गुणांसह द्वितीय तर दिपाशा संतोष पावसकर हिने ९४.४० टक्के प्राप्त करून तृतीय क्रमांक मिळवला आहे.

माजगाव हायस्कूल निकाल ९८.४१ टक्के
भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालय माजगावचा दहावीचा निकाल ९८.४१ टक्के लागला आहे. त्यात प्राजक्ता भाऊसाहेब चवरे ही विद्यार्थिनी ९९.४० टक्के गुण मिळवीत प्रशालेत प्रथम आली आहे. खुशी तुकाराम भोगण ९८ टक्के गुणांसह द्वितीय तर करिष्मा कृष्णा सावंत हिने ९५.२० टक्के गुण मिळवीत तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.

मळगाव हायस्कूलचा 100 टक्के
मळगाव इंग्लिश स्कूल मळगावचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. प्रशालेतील सर्व १२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ओमकार संतोष गोसावी ९८.२० टक्के गुण मिळवीत प्रशालेत प्रथम आला आहे. समर्था संजय गावडे ९६.८० टक्के गुणांसह द्वितीय तर अपर्णा भीमसेन नाईक ९६.२० टक्के गुण मिळवीत तृतीय आली आहे.

देवसू हायस्कूलचा निकाल 100 टक्के
माध्यमिक विद्यालय देवसूचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे.बाळकृष्ण संभाजी सावंत या विद्यार्थ्याने ९१.८० गुण मिळवून प्रशालेत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. साहिल विलास गावकर ९०.४० टक्के गुण मिळविले तर सिद्धी संतोष सावंत हिने ८८.४०टक्के गुण मिळवीत तृतीय क्रमांक मिळविला आहे.

आजगाव विद्याविहार हायस्कूलचा 100 टक्के
विद्याविहार इंग्लिश स्कूल आजगांवने आपली शतप्रतिशत यशाची परंपरा कायम राखली आहे. प्रशालेतील सर्व २५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. प्रतीक्षा कृष्ण रगजी ही विद्यार्थिनी ९२ टक्के गुण मिळवीत प्रशालेत प्रथम आली आहे. दत्तराज शशिकांत नादकर ९१ टक्के गुणांसह द्वितीय तर दिव्या विनोद पांढरे ८८ टक्के गुण मिळवीत तृतीय आली आहे.

नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुली 100 टक्के
शीतल अर्जुन मिस्त्री ९४ टक्के गुण मिळवीत प्रशालेतून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. गौरी गणेश राणे ९३.८० टक्के गुणांसह द्वितीय तर समिधा राजेंद्र शिंदे ९३.६० टक्के गुण तृतीय आली आहे.

सोनुर्ली हायस्कूलचा निकाल शंभर टक्के
माऊली माध्यमिक विद्यालय सोनुर्लीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. यात प्राची दामोदर पालेकर ९२.६० टक्के गुण मिळवित प्रशालेत प्रथम आली आहे. प्रीती महादेव गावडे ९० टक्के गुण विद्युतीय तर संचिता पांडुरंग निर्गुण ८९.२० टक्के गुण मिळवीत तृतीय आली आहे.

कलंबीस्त हायस्कूलचा निकाल 100 टक्के
कलंबिस्त इंग्लिश स्कूल कलंबीस्तचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. प्रशालेतील ओंकार दत्ताराम नाईक या विद्यार्थ्याने ९०.२० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला असून वैष्णवी संतोष राऊळ ८८.८० टक्के गुण मिळवित द्वितीय तर अंकेश प्रकाश पावरा हा विद्यार्थी ८८.२० टक्के गुण मिळवित तृतीय आला आहे.

नेमळे हायस्कूलचा ९८.६५ टक्के निकाल
नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नेमळेचा दहावीचा निकाल ९८.६५ टक्के लागला आहे. आसिया आसद सांगावकर ९५.६० टक्के गुण मिळवीत प्रशालेत प्रथम आली असून तेजल आनंद करंगुटकर ९१.४० टक्के गुण द्वितीय तर प्रणया मंगेश वेंगुर्लेकर ९१.२० टक्के गुण मिळवीत तृतीय आली आहे.

कारीवडे हायस्कूलचा दहावीचा निकाल 100 टक्के
आप्पासाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालय कारिवडे चा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. पल्लवी भिकाजी गोसावी ९४.४० टक्के गुण मिळवीत प्रशालेत प्रथम आली असून रुचिका विक्रम गवळी ८९.४० टक्के गुण मिळवीत दुसरी तर तनया शंकर सावंत ८८.२० टक्के गुण मिळवीत तृतीय आली आहे.

शिरशिंगे हायस्कूलचा निकाल 100 टक्के
पावणाई रवळनाथ विद्यामंदिर शिरशिंगेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. प्रशालेची विद्यार्थिनी विशाखा राऊळ ९०.४० टक्के गुणांसह प्रथम वैष्णवी गावडे ८९.६० टक्के गुणांसह द्वितीय तर दिव्या राहुल ८९ टक्के गुण मिळविले आली आहे.

आरोस विद्याविकास हायस्कूलचा निकाल 100 टक्के
आरोस पंचक्रोशी विद्याविकास हायस्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. रश्मी रूपेश घोगळे ९१.८० टक्के गुणांसह प्रथम आली असून दशरथ गोविंद नाईक ८९.४० गुण मिळवित द्वितीय तर गंगाबाई रवी दसपनार ८७.४० टक्के गुण मिळवून तिसरी आली आहे.

ओटवणे रवळनाथ विद्यामंदिर चा निकाल ९८ टक्के
ओटवणे रवळनाथ विद्यामंदिर या प्रशालेचा शालांत परीक्षेचा या वर्षीचा निकाल ९८ टक्के एवढा लागला असून परीक्षेस बसलेल्या ५४ विद्यार्थ्यांपैकी ५३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रशालेतून आर्यन उमेश गावकर याने ९५ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला तर हृषिकेश प्रभाकर गावकर ९३.६० व प्रज्वल पूनाजी पनासे याने९२.२० टक्के मिळवत अनुक्रमे द्वितीय व तृतिय क्रमांक पटकविला.

कोलगाव हायस्कूलचा ९३.९३ टक्के निकाल
कोलगाव माध्यमिक विद्यालय कोलगावचा दहावीचा निकाल ९३.९३ टक्के लागला आहे. प्रशालेचा विद्यार्थी आदित्य लक्ष्‍मण लांबर ९३.८० टक्के गुणांसह प्रथम सोनाली भिकाजी राऊळ ९३.४० टक्के गुण मिळवीत द्वितीय तर विवेक मधुकर कविटकर ८९ टक्के गुण मिळवून तृतीय आला आहे.

सांगेली हायस्कूलचा 100 टक्के निकाल
माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय सांगेलीचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. परीक्षेस बसलेले सर्व ४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात अक्षता लातये ९३.२० टक्के गुण मिळवून प्रथम सानिका राऊळ ९१.२० टक्के गुण मिळवित द्वितीय तर मिहीर मुरकर ९०.६० टक्के गुणांसह तृतीय आला आहे.

दाणोली हायस्कूलचा निकाल 100 टक्के
कै.बाबुराव पाटयेकर हायस्कूल दाणोलीचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला असून परीक्षेस बसलेले सर्व २५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात गोपीनाथ रामा भोरे ९१.६० टक्के गुण मिळवून प्रथम आला आहे आदित्य सर्जेराव सावंत ९०.६० टक्के गुण मिळवीत प्रशालेत द्वितीय तर राजाराम सुभाष सावंत ९०.२०टक्के गुण मिळवीत तिसरा आला आहे.

चौकुळ हायस्कूलचा निकाल 100 टक्के
चौकुळ इंग्लिश स्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. यात पौर्णिमा विठ्ठल राऊळ९१.८० टक्के गुण मिळवीत प्रशालेत प्रथम आली असून प्राची प्रभाकर परब ९०.४० टक्के गुण मिळवून द्वितीय तर पूर्वा बाबुराव गावडे९०.२० टक्के गुण मिळवीत तृतीय आली आहे.

आंबोली युनियन स्कूलचा 100 टक्के निकाल
आंबोली येथील युनियन इंग्लिश हायस्कूलचा निकाल शंभर टक्के लागला. नमिता उमेश गावडे हिने प्रथम क्रमांक मिळविला असून तीला ९५.८० टक्के गुण मिळाले आहेत. द्वितीय क्रमांक सोनल सुनिल गावडे ९३ टक्के तर तृतीय अभिषेक अशोक गावडे याने ९१.६० टक्के मिळविले.

आंबोली सैनिक स्कूलचा १०० टक्के निकाल
आंबोली सैनिक स्कूलने दहावीच्या निकालातील आपली शतप्रतिशत यशाची परंपरा कायम राखली असून दहावीच्या परीक्षेत बसलेले सर्व ४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात विघ्नेश सदाशिव जुवळे ९२.६० टक्के गुण मिळवीत प्रथम आला असून यश जितेंद्र कासले व तन्मय शशिकांत राणे हे संयुक्तरित्या९०.६० टक्के गुण मिळवित द्वितीय तर साहिल वासुदेव नाईक ९९.२० टक्के गुण मिळवीत तृतीय आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments