Tuesday, March 18, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याशिरोडा-वेळागर येथे जखमी घारीला प्राणीमित्रांकडून जीवदान..

शिरोडा-वेळागर येथे जखमी घारीला प्राणीमित्रांकडून जीवदान..

वेंगुर्ले.ता,२९:  शिरोडा वेळगार किनाऱ्यावर जखमी होऊन समुद्राच्या पाण्यात पडलेल्या घारीला वाचविण्यास स्थानिक युवकांना यश आले.त्यांनी घारीवर प्राथमिक उपचार करून तिला सुखरूप नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.
आज सायंकाळी सागररक्षक सूरज अमरे किनाऱ्यावर फेरफटका मारत असताना त्याला समुद्राच्या लाटेवरून उडणारा मासा पकडण्याच्या नादात घार लाटेवर आपटून पाण्यात पडल्याचे दिसले यावेळी तात्काळ त्याने आपल्या सोबत कासव मित्र आबा चिपकर, ग्राम पंचायत सदस्य आजू अमरे, सचिन भगत, संतोष भगत यांच्या मदतीने घारीला बाहेर काढले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments