बांदा ता.३०: सिंधु आत्मनिर्भर अभियान अंतर्गत भाजपाच्या बांदा मंडलातील शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेल्या हळद लागवडीसाठी मोफत खताचे वितरण उद्या सकाळी ११ वाजता ग्रामपंचायत सभागृहात करण्यात येणार आहे.
महिला बचतगट व शेतकऱ्यांना भाजपाच्या सिंधु आत्मनिर्भर अभियान अंतर्गत काही दिवसापूर्वी सेलम हळदीचे बियाणे मोफत देण्यात आले होते. या कार्यक्रमाला पंचायत समिती सभापती मानसी धुरी, उपसभापती शीतल राऊळ, जिल्हा परिषद सदस्य श्वेता कोरगावकर, सरपंच अक्रम खान, भाजपचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
ज्या शेतकऱ्यांना हळद बियाणे वाटप करण्यात आले आहे त्याच शेतकाऱ्यांना खत वितरित करण्यात येणार आहे. बियाणे घेतलेल्या शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सरपंच खान यांनी केले आहे.
सिंधु आत्मनिर्भर अभियान अंतर्गत बांद्यात उद्या खत वाटप….
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES