Tuesday, March 18, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यागुगल मॅपिंग होणाऱ्या दिशादर्शक फलकांच्या उभारणीला सुरवात...

गुगल मॅपिंग होणाऱ्या दिशादर्शक फलकांच्या उभारणीला सुरवात…

नगराध्यक्षांच्या उपस्थितीत कामाची पाहणी ; उभारणी प्रक्रियेनंतर होणार लोकार्पण…

मालवण, ता. ३० : जिल्हा वार्षिक योजना, पर्यटन स्थळ विकास मुलभूत सुविधा अनुदान सन २०१९-२० अंतर्गत शहरात मंजूर करण्यात आलेल्या दिशादर्शक व महिती फलकांच्या उभारणीच्या कामाची पाहणी आज नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
कोळंब-देऊळवाडा सागरी महामार्ग येथील दिशादर्शक फलक उभारणीच्या कामाची पाहणी करण्यात आली. यावेळी बांधकाम सभापती यतीन खोत, नगरसेवक मंदार केणी उपस्थित होते. तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यकाळात फलक उभारणीसाठी सुमारे २० लाख ८६ हजार ६२ रुपयांचा निधी मंजूर झाला. सुमारे १५० दिशादर्शक माहिती फलकांसाठी निविदा प्रक्रिया पार पडल्यानंतर ५.८८ टक्के कमी दराची निविदा मंजूर झाली. पालिकेचा १ लाख २० हजार फायदा झाला. मात्र त्या रक्कमेतून अधिकचे माहिती फलक बनवून त्याचीही उभारणी शहरात केली जाणार असल्याची माहिती नगराध्यक्ष श्री. कांदळगावकर यांनी दिली.
मोठ्या शहरातील रस्त्यावरील एल आकाराच्या सिग्नल यंत्रणेप्रमाणे काही कॅन्टीलिव्हर दिशादर्शक फलक शहरातील प्रमुख रस्त्यावर बसविले जाणार आहेत. शहरात अन्य ठिकाणाहून आलेली व्यक्ती अथवा पर्यटकांना शहरात फिरताना कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी घेऊन फलक बनविले आहेत. अशी माहिती बांधकाम सभापती यतीन खोत यांनी दिली.
शहरातील या दिशादर्शक फलकांचे गुगल मॅपिंग होणार आहे. त्यामुळे गुगल मॅपद्वारे फिरणाऱ्या पर्यटकांनाही याचा फायदा होणार आहे. शहरातील सर्व ठिकाणे, मंदिर, मशीद, चर्च या सर्वाचा उल्लेख आहे. शहराच्या प्रवेशद्वारावर शहराचा मोठा नकाशा उभारण्यात येणार आहे. सर्व फलक उभारणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत लोकार्पण होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष श्री. कांदळगावकर यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments