पूल कोसळल्याने कणकवलीकरांत तीव्र संताप
कणकवली, ता.३१ : कणकवली शहरात येथे उड्डाणपूल कोसळला तेथील गर्डर आणि स्लॅबचे काम चार महिन्यापूर्वी पूर्ण करण्यात आले होते. आज सकाळी साडेदहाच्या सुमारास अचानक बॉर्डर आणि स्लॅब कोसळल्याने कणकवली करातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
कणकवली शहरात एस एम हायस्कूल ते गड नदी पर्यंत 44 पिलर उभारून उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. यातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मेडिकल या दरम्यान बॉक्स बॉर्डर बांधलेले काम चार महिन्यापूर्वीच पूर्ण झाले होते. पुलावर स्लॅब घातल्यानंतर त्या खालील सपोर्ट काढन्यात आले आणि सेवा रस्त्यावरून वाहतूक देखील सुरू करण्यात आली होती.
महामार्ग चौपदरीकरणाचे काम निकृष्ट होत असल्याच्या तक्रारी सातत्याने नागरिकांकडून केल्या जात होत्या. मात्र त्याकडे हायवे प्रशासनाने सोयीस्कर दुर्लक्ष केल्याची भावना शहरवासीयातून व्यक्त होत आहे.