जिल्हाधिका-यांची माहिती; सरसकट तपासणी होणार नाही…
सिंधुदुर्गनगरी,ता.३१: गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होणाऱ्या चाकरमान्यांची रॅपिड टेस्ट करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. परंतु ही तपासणी सरसकट न करता ज्यांना कोरोनाची लक्षणे आहेत,अशांची टेस्ट करण्यात येणार आहे.याबाबतची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आलेली आहे.
चतुर्थीच्या पाश्वभूमीवर जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होवू नये, यासाठी धोरण ठरवण्यात आले आहे. याठिकाणी येणाऱ्या चाकरमान्यांची तपासणी नाक्यावर रेपीड टेस्ट करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. मात्र,हा निर्णय घेतला असला तरी सर्वांची तपासणी केली जाणार नाही, असे याबाबत जिल्हा माहिती कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.