सोशलडिस्टन्सचे भान ठेवून नारळी पौर्णिमा उत्सव साजरा करा ; परिमल नाईक…
सावंतवाडी ता.३१: नारळी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर पालिकेकडून येथील मोती तलावाचा परिसर स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे,अशी माहिती आरोग्य सभापती अँड.परिमल नाईक यांनी दिली.दरम्यान कोरोना
विषाणूच्या वाढता प्रादुर्भाव या परिस्थितीचे भान ठेऊनचं हा सण साजरा करण्यात यावा,असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे.
त्यात म्हटल्या प्रमाणे,नारळी पौर्णिमा उत्सव सावंतवाडी मोती तलाव येथे साजरा होणार आहे.यावेळी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव परिस्थितीचे भान ठेऊन सामाजिक अंतर,मास्क लावून ,व गर्दी टाळून हा सण साजरा करावा.