मालवण, ता. ३१ : येथील रोटरी क्लबच्या वतीने माता काशीबाई मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट संचलित भरतगड इंग्लिश मिडीयम स्कूल मसुरे प्रशालेस २५ बेंचेस सुपूर्द करण्यात आले.
यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष हेमेंद्र गोवेकर, सेक्रेटरी उमेश सांगोडकर, महेश काळसेकर, अजय जोशी यासह स्कूल कमिटी अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, मर्ढे सरपंच संदीप हडकर, मुख्याध्यापिका शुभांगी लोकरे-खोत, शिक्षक किशोर देऊलकर, पार्वती कोदे, रेश्मा बोरकर यासह संतोष सावंत, वसंत प्रभुगावकर आदी उपस्थित होते.
रोटरी क्लबच्या वतीने विविध सामाजिक कार्यक्रम विविध स्तरावर वर्षभर राबवले जातात. त्याच अनुषंगाने ग्रामीण भागात दर्जेदार इंग्रजी माध्यमाचे शिक्षण देणारी शाळा अशी ओळख अल्पावधीत निर्माण करणाऱ्या भरतगड इंग्लिश मिडीयम प्रशालेस बेंचेस स्वरूपात मदत उपलब्ध करण्यासाठी संधी आम्हाला मिळाली याबाबत आम्ही शाळेचे आभार व्यक्त करतो. अशा भावना यावेळी उपस्थित रोटरी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या.
प्रशालेच्या मागणी नुसार २५ बेंचस सेट उपलब्ध करून दिल्याबद्दल स्कुल कमिटी अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर व मुख्याध्यापिका शुभांगी लोकरे यांनी रोटरी क्लबचे आभार मानले.