प्रा.दिलीप भारमल; विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश अर्ज करण्याचे आवाहन…
सावंतवाडी ता.३१: येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयात
प्रथम,द्वितीय व तृतीय वर्ष आर्ट्स,कॉमर्स व सायन्स या विभागात प्रवेश घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात न येता ऑनलाइन अर्ज भरूनच आपला प्रवेश निश्चित करावा,असे आवाहन प्रशालेचे प्राचार्य डॉ.दिलीप भारमल यांनी केले आहे.याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे.
त्यात म्हटल्याप्रमाणे,श्री पंचम खेमराज महाविद्यालय हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक अग्रगण्य महाविद्यालय असून दरवर्षी सुमारे दोन हजार विद्यार्थी या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतात.मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या या महाविद्यालयात पदवी व पदवी पदव्युत्तर स्तरावर विविध विषयांमध्ये पदवी प्राप्त करता येते. सायन्स शाखेकडे रसायनशास्त्र,भौतिकशास्त्र,प्राणीशास्त्र,वनस्पतीशास्त्र तसेच आयटी कम्प्युटर सायन्स या विषयांमध्ये एससी करता येते. मराठी,हिंदी,इंग्रजी,इकॉनोमिक,भूगोल,मानसशास्त्र या विषयांमध्ये बी.ए तर बी कॉमर्स विभागाकडे बीकॉम व बीकॉम बँकिंग इन्शुरन्स यामध्ये पदवी प्राप्त करता येते. याचबरोबर एसएससी रसायनशास्त्र, प्राणिशास्त्र व वनस्पती शास्त्र, तसेच एम ए हिंदी ,इंग्रजी व अर्थशास्त्र या विषयात तर एम कॉम हा पदव्युत्तर अभ्यासक्रम ही महाविद्यालयात उपलब्ध आहे.
प्राणिशास्त्र विषयांमध्ये पीएचडी ही करता येते, एन एएसी या संस्थेकडून महाविद्यालयात द ग्रेट नामांकन प्राप्त आहे.महाविद्यालयात I so9001 सर्टिफिकेट प्राप्त झालेले आहे.मुंबई विद्यापीठाचे बेस्ट कॉलेज अवॉर्ड महाविद्यालयाला प्राप्त झालेले आहे.
या महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी अर्ज करण्याकरिता आता महाविद्यालय मध्ये प्रत्यक्ष न येता महाविद्यालयाचा www.spkcollege.org या संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज भरून नोंदणी करता येऊ शकते,तसेच प्रथम द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या mum.digitaluniversity.ac या संकेतस्थळावरून नोंदणी करणे आवश्यक आहे.प्रथम वर्ष कला, वाणिज्य ,विज्ञान यासाठी विभागात प्रवेश घेणाऱ्या महाविद्यालयाच्या संकेतस्थळावरून माहितीपत्रक पाहूनच विषयाची निवड करावी.
ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा महाविद्यालयांमध्ये उपलब्ध करण्यात आलेली आहे.प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी
विज्ञान विभाग-डॉ.गणेश मर्गज 9420209013,डॉ. डी बी शिंदे 7066175697
कला विभाग- डॉ. प्रगती नाईक 9422374329
डॉ.सुधीर बुवा 9422810226
कॉमर्स विभाग-प्रा.सचिन देशमुख 7875582850
यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन श्री. भारमल यांनी केले आहे.