Sunday, March 16, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याकणकवली तालुक्यातील मौजे कुंभवडे बामणवाडी येथे कंटेन्मेंट झोन....

कणकवली तालुक्यातील मौजे कुंभवडे बामणवाडी येथे कंटेन्मेंट झोन….

सिंधुदुर्गनगरी.ता,३१: कणकवली तालुक्यातील मौजे कुंभवडे बामणवाडी येथील राजेंद्र वासुदेव गुळगुळे यांच्या घराजळील ५० मीटर परिसर कोरोना विषाणुच्या प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे, अशी माहिती  कणकवली उपविभागीय अधिकारी वैशाली राजमाने यांनी दिली.
या कंटेन्मेंट झोनमध्ये दिनांक १२ ऑगस्ट २०२० रोजी रात्री १२ वाजेपर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तुविक्री बंद राहणार आहे. तसेच या बाधित क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे-जा व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदबाबत आदेशीत करण्यात आले आहेत. हे आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ कलम ५१ व ५८ अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, १९५१ चे कलम ७१,१३९ तसेच भारतीय दंड संहिता (४५ ऑफ १८६०)  च्या कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments