अमित सामंत ; ठेकेदाराला काळया यादित टाकण्याची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी..
कणकवली ता.३१: येथे झालेल्या प्रकारानंतर मुंबई-गोवा महामार्गाच्या दर्जाचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.या महामार्गाचे काम लक्षात घेता कामाचे स्ट्रक्चरल ऑडिट करा,तसेच संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाका,अशी मागणी आपण सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादीच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करणार आहे.असा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दिला आहे.याबाबत त्यांनी निवेदन दिले आहे.
त्यात असे नमूद करण्यात आले आहे की,कलमठ ते झाराप पर्यंत महामार्गाच्या निकृष्ट कामाचे स्ट्रक्चरल ऑडीट झालेच पाहिजे. तसेच संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून गुन्हा दाखल करण्याची मागणी आपण श्री.पवार यांच्याकडे ईमेलद्वारे केलीअसून.यात गेली दोन वर्षे हुकूमशाही गाजवत कुणाच्याही विरोधाला न जुमानता शासकीय यंञणेला हाताशी धरून केंद्रीय राजकिय वलय घेऊन कलमठ ते झाराप पर्यंतच्या महामार्गाचे अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम करून जिल्ह्यातील जनतेच्या जिवीताशी खेळण्याचा प्रयत्न करून जिल्ह्यात मनमानी कारभार सुरू आहे.त्याची सखोल चौकशी झालीच पाहिजे,असे म्हटले आहे.