रविंद्र चव्हाण ; कणकवलीत कोसळलेल्या स्लॅब बाबत गडकरींचे लक्ष वेधणार…
सावंतवाडी ता.३१: जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्या बाबत माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी घेतलेल्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत,अशी भूमिका राज्याचे माजी राज्यमंत्री तथा आमदार रवींद्र चव्हाण यांनी आज येथे मांडली.दरम्यान कणकवली येथे कोसळलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाबाबत आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे लक्ष वेधणार असून,संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी आपण यापूर्वीच केली आहे,असेही त्यांनी यावेळी सांगितले.आज सावंतवाडी नगरपालिकेला श्री.चव्हाण यांनी भेट दिली.
सावंतवाडी नगरपरिषदे मध्ये नगराध्यक्ष संजू परब यांच्या कामाचे व्यापाऱ्यांकडून कौतुक करण्यात आले त्यावेळी माजी राज्यमंत्री आमदार चव्हाण उपस्थित होते त्यानंतर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचे बैठक त्यांनी घेतली यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली नगराध्यक्ष संजू परब नगरसेवक परिमल नाईक आनंद नेवगी नासिर शेख उदय नाईक दिपाली भालेकर सभापती मानसी धुरी उपसभापती शीतल राऊळ, भाजपचे मंडल अध्यक्ष संदीप गावडे, बंटी पुरोहित अजय गोंधावळे दिलीप भालेकर केतन आजगावकर व पदाधिकारी उपस्थित होते
श्री गणेश चतुर्थीच्या निमित्ताने चाकरमानी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत त्यांना क्वारंटाईन करण्याबाबतच्या भूमिके बाबत सध्या सरपंच प्रशासन यांच्या वेगवेगळ्या भूमिका आहेत त्याबाबत विचारले असता आमदार रवींद्र चव्हाण म्हणाले, माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी घेतलेल्या भूमिकेशी भाजपा सहमत आहे.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली म्हणाले चाकरमानी लोकांची मोफत तपासणी करूनच चाकरमानी लोकांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरकारने सोडावे अशी भाजपाची मागणी आहे . यावेळी चाकरमानी लोकांची शंभर टक्के तपासणी करावी या मताशी भाजपा सहमत आहे असे ते म्हणाले.
यावेळी श्री चव्हाण म्हणाले अयोध्येत प्रभू रामचंद्र यांच्या मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि.५ ऑगस्ट रोजी होत आहे यावेळी कोरोनामुळे रामभक्त यांनी घरोघरी किंवा गावागावात उत्साहात साजरा करावा सुमारे पाचशे वर्षांपूर्वी पासूनची प्रभू राम मंदिराची मागणी पूर्तता होत आहे तोही क्षणहिंदूनी आनंदात साजरा करावा असे रवींद्र चव्हाण म्हणाले
मुंबई-गोवा महामार्गावरील कणकवली येथे कोसळलेल्या स्लॅब बाबत श्री. चव्हाण म्हणाले, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत या ठेकेदारावर कारवाई व्हावी म्हणून देखील मागणी या अगोदर केली आहे. आता पुन्हा एकदा याविषयी चर्चा करून मागणी केली जाणार आहे.