विरोधकांच्या मागणीनंतर तहसीलदारांचे आदेश; व्यावसायिकांना पुर्ववत जागा देण्याच्या मुख्याधिकार्यांना सुचना…
सावंतवाडी.ता,०१: कोरोनाच्या पार्श्वभूमिवर येथिल पालिकेकडुन शहरातील व्यापार्यांवर करण्यात आलेली स्टॉल हटावची कारवाई चतुर्थीपर्यंत जैसे थे ठेवण्याबरोबरच संबधित व्यावसायिक व भाजी विक्रेत्यांना पुर्ववत जागा देण्यात यावी,असे आदेश सावंतवाडीचे तहसिलदार तथा आपत्कालीन यंत्रणेचे प्रमुख राजाराम म्हात्रे यांनी पालिका मुख्याधिकार्यांना दिले आहे.याबाबतची मागणी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाकडुन करण्यात आली होती.तसेच सोशल डिस्टंसिंगचा नियम मोडुन करण्यात आलेली, ही कारवाई योग्य नाही,त्यामुळे केलेली स्टॉल हटावची कारवाई स्थगित करण्यात यावी,अशी मागणी महाविकास आघाडीच्या पदाधिकार्यांकडुन करण्यात आली होती.त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
याबाबतची तहसिलदार श्री म्हात्रे यांनी राष्ट्रवादीच्या मागणीला अनुसरून स्टॉल हटाव आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे. याबाबतचा आदेश त्यांनी मुख्याधिकार्यांना दिला आहे.यात असे नमुद केले आहे,की येथिल पालिकेच्या गवत मार्केट मध्ये पुरेशी जागा उपलब्ध नसल्यामुळे त्या ठीकाणी सोशल डीस्टसिंगच्या नियमाचा भंग होत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच आधीच कोरोना महामारी सारख्या संकटात सापडलेल्या व लॉकडाउन मुळे उपासमारीची वेळ आलेल्या व्यापार्यांना कोणतीही पुर्वकल्पना न देता पालिका प्रशासनाकडुन करण्यात आलेली ही कारवाई चुकीची आहे. त्यामुळे संबधित व्यापार्यांनी याबाबत योग्य तो निर्णय न झाल्यास आपल्या हक्कासाठी आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही,असे कळविले आहे.त्यामुळे वरिल वस्तूस्थिती निर्दशनास घेता, आपण अतिक्रमण हटाव मोहीमेच्या कारवाईला गणेश चतुर्थी पर्यत स्थगिती देवून जैसे थे ठेवण्याबाबतची कार्यवाही करावी,असे त्यांनी या पत्रात नमुद केले आहे.