परशुराम उपरकर ; रुग्णांना चुकीचे दाखले दिल्याचा आरोप…
कणकवली ता.०१: जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून तपासणी करण्यात येणार्या कोरोना अहवालात मोठा घोळ असल्याचा आरोप मनसेचे नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला आहे.यात अनेक पॉझिटिव्ह लोकांना त्यांनी निगेटिव्ह अहवाल दिला होता,तर निगेटिव्ह लोकांना पॉझिटिव्ह अहवाल दिला होता.त्यामुळे जो पर्यत पॉझिटिव्ह अहवाल मिळत नाही,तो पर्यत कोणाला अॅडमिट करण्यात येवू नये,असेही त्यांनी म्हटले आहे.
याबाबत श्री.उपरकर यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे.त्यात असे नमूद केले आहे की,जिल्हा रुणालयाच्या माध्यमातुन सुरू असलेल्या कोरोना स्वँब तपासणी अहवालात मोठा घोळ असल्याचे दिसून येत आहे.पॉझिटिव्ह रुग्णांना निगेटिव्ह व निगेटिव्ह रुग्णांना पॉझिटिव्ह रिपोर्ट दिल्याची अनेक उदाहरणे आहेत.त्यामुळे संबंधीत व्यक्तींना पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्हबाबतचे तात्काळ रिपोर्ट देऊन नंतरच पॉझिटिव्ह असलेल्यांना अडमीट करावे,अशी मागणी आपण जिल्हाधिकाऱयांकडे केली आहे. तसेच पॉझिटिव्ह आल्यानंतर फोन करून थेट अडमीट करणे चुकीचे असून त्यांना मुंबई वा अन्य ठिकाणी उपचारास जायचे असल्यास, किंवा दुसरीकडे स्वॅब रिपोर्ट करावयाचा असल्यास तो करण्यास द्यावा,अशीही मागणी केली असल्याचे श्री.उपरकर यांनी म्हटले आहे.