संशयितांना अटक; दिड लाख रुपयांचा मुद्देलाल चोरल्याचा आरोप…
देवगड ता.०१: चाकूचा धाक दाखवून देवगड येथिल एका महीलेला लुटल्याचा प्रकार घडला आहे.विशेष म्हणजे संबधितांनी आपल्याला लुटताना आपल्याशी अश्लील वर्तन केले,असा आरोप संबधित महीलेने केला आहे.तसेच यात आपले एक लाख तीस हजाराचे दागिने संबंधितांनी लंपास केल्याची तक्रार तीने केली आहे.या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना आज येथिल न्यायालयात हजर केले असता तीन दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. प्रसाद खडपकर (रा.देवगड) व विनोद विलास जुवाटकर (रा.पडवणे),अशी संशयितांची नावे आहेत.याबाबतची माहीती सहाय्यक पोलिस निरिक्षक संजय कातीवले यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की,संशयितांनी संबंधित महिलेला चाकूचा धाक दाखवून २५ हजार रूपये किमतीचे १० ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, ५० हजार रूपये किमतीची २० ग्रॅमची सोन्याची चैन, ५० हजार रूपये किमतीच्या दोन प्रत्येकी १० ग्रॅम वजनाच्या सोन्याचा बांगड्या, ५ हजार रूपये किमतीच्या दोन सोन्याचा कुड्या काढून घेतल्या.एकूण १ लाख ३० हजाराचा ऐवज लांबविला व एटीएम् कार्ड काढून घेतली.देवगडमध्ये घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली असून या घटनेचा अधिक तपास श्री.कातिवले करीत आहेत.