Sunday, March 16, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यानारळी पौर्णिमे दिवशी वेंगुर्ले बंदरावर जाण्यास बंदी...

नारळी पौर्णिमे दिवशी वेंगुर्ले बंदरावर जाण्यास बंदी…

दिलीप गिरप; मानाचा नारळ अर्पण करण्यास परवानगी..

वेंगुर्ला,ता.०१: नारळी पौर्णिमा सणादिवशी वेंगुर्ले बंदरावर जाण्यास नागरिकांना बंदी घालण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोमवारी होणाऱ्या या सणाला फक्त मानाचेच नारळ सागराला अर्पण करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी दिली.
नारळी पौर्णिमे दिवशी वेंगुर्ला बंदर या ठिकाणी करण्यात येणाऱ्या नियोजनासाठी वेंगुर्ला नगरपरिषदेच्या दालनात बैठक पार पडली. या बैठकीत केवळ पोलिस स्टेशन, तहसिलदार कार्यालय, नगरपरिषद, रिक्षा संघटना, व्यापारी संघटना व मच्छिमार संघटना यांनी मानाचे नारळ सागराला अर्पण करावेत असे सर्वानुमते ठरविण्यात आले. तसेच वेंगुर्ला बंदर या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे दुकाने किवा स्टॉल लावण्यात येऊ नये. नारळ अर्पण करताना मानकरी यांच्यासोबत केवळ दोन व्यक्तींनीच बंदारावर जावे, असेही ठरविण्यात आले. तरी नारळी पौर्णिमेदिवशी नागरीकांनी वेंगुर्ला बंदर या ठिकाणी गर्दी करुन आपले आरोग्य धोक्यात आणू नये व यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. नारळी पौर्णिमा हा दिवस मच्छिमार बांधवांमध्ये उत्साहाचा असतो. मात्र, यावर्षीची गंभीर परिस्थिती पाहत नाईलाजाने प्रातिनिधीक स्वरुपात हा सण आपल्याला साजरा करावा लागणार आहे. तरीही नागरिकांनी नाराज न होता कोरोना विरुद्धची शिस्तबद्ध लढाई कायम ठेवावी, असे आवाहन नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments