Sunday, March 16, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यासंजू विरनोडकर टीमकडून सातार्ड्यात जंतुनाशक फवारणी....

संजू विरनोडकर टीमकडून सातार्ड्यात जंतुनाशक फवारणी….

सावंतवाडी,ता.०२: सातार्डा गावात कोविडचा रुग्ण आढळल्याने खबरदारीचा उपाय म्हणून बेंझलकोनियम क्लोराईड सोल्युशनची जंतुनाशक फवारणी संजू विर्नोडकर टीम कडून करण्यात आली.
यावेळी देऊळवाडी बाजारपेठ, बँकांचा परिसर, ग्रामपंचायत कार्यालय, पूर्ण प्राथमिक शाळा परिसर, श्री देव रवळनाथ मंदिर परिसर,श्री देव महादेव मंदिर, श्री देव हनुमान मंदिर, त्या रुग्णाच्या घराचा परिसर, ख्रिश्चनवाडी तिठा परिसर, सातार्डा पोलीस चेकपोस्ट, सातार्डा बाजारपेठ, धान्य वितरण क्रेंद्र परिसर, श्री देव महापुरुष मंदिर आदी ठीकाणी संजू विर्नोडकर, आकाश मराठे, विजय गोवेकर, प्रितेश आरोंदेकर यांनी फवारणी केली.
यावेळी त्यांना मदत करण्यासाठी रविंद्र धुपकर, सागर प्रभू, किरण प्रभू, ज्ञानदीप राऊळ, रॉनी रॉड्रीक्स, काशिनाथ केरकर, भगवान सातार्डेकर, अर्जुन सातार्डेकर, सुरेश राऊळ, श्रीधर पेडणेकर, सागर राऊळ, तेजस केरकर, स्वप्निल हरमलकर, योगेश मांजरेकर,संजय मांजरेकर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments