वैभववाडी शिवसेना प्रमुख मंगेश लोके यांच्याकडुन आयोजन …
वैभववाडी. ता,०२: वैभववाडी-शिवसेना तालुका प्रमुख तथा पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांच्या सौजन्याने खांबाळे गावातील एस. एस. सी. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा गुणगौरव सोहळा ग्रामपंचायत सभागृहात संपन्न झाला. यावेळी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना मास्क, शैक्षणिक साहित्य व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यावेळी मान्यवरांनी सर्व गुणवंत विदयार्थ्यांना आपल्या पुढील शैक्षणिक वाटचालीत यशस्वी होण्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या. गेली अनेक वर्षे मंगेश लोके यांच्या माध्यमातून गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव केला जात आहे. सदरच्या कार्यक्रमाला शिवसेना तालुका प्रमुख तथा पंचायत समिती सदस्य मंगेश लोके, सरपंच सारिका सुतार, उपसरपंच लहू साळुंखे, सिने नाट्य दिग्दर्शक दीपक कदम, माजी चेअरमन दीपक चव्हाण, प्रगतशील शेतकरी प्रवीण गायकवाड, दीपक पवार, दत्तात्रय परब, अंबाजी पवार, सत्यवान सुतार, राजेंद्र पवार, सुरेश कर्पे, मोहन पवार व गुणवंत विद्यार्थी आदी उपस्थित होते.